Ad will apear here
Next
जनसेवा पुरस्कार नाना पालकर स्मृती समिती संस्थेस जाहीर
जनसेवा पुरस्काराची घोषणा करताना (डावीकडून) जनसेवा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक जोशी, अध्यक्ष प्रदीप जगताप, संचालक राजेंद्र वालेकर आणि सरव्यवस्थापक किशोर घोलबा

पुणे  : गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रूग्णांना अत्यल्प दरात उच्चतम वैद्यकीय मदत करणाऱ्या नाना पालकर स्मृती समिती संस्थेस यंदाचा जनसेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. जनसेवा सहकारी बँकेच्या वतीने दर वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.

‘बँकेच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवारी,२४ ऑक्टोबर रोजी  वानवडी येथील महात्मा ज्योतीराव फुले सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) अध्यक्ष हणमंतराव गायकवाड उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती जनसेवा सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक किशोर घोलबा, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक जोशी, अध्यक्ष सीए प्रदीप जगताप, संचालक राजेंद्र वालेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

‘२४ ऑक्टोबर १९९८ पासून या पुरस्काराची सुरुवात झाली. सुरुवातीला या पुरस्काराचे स्वरूप रोख २५ हजार रुपये होते. ३९व्या वर्धापन दिनापासून पुरस्काराची रक्कम ५१ हजार रुपये झाली, तर ४३व्या वर्धापन दिनापासून पुरस्काराची रक्कम एक लाख एक हजार रुपये करण्यात आली. १९९८ मध्ये पहिला पुरस्कार दादा किराड, प्रभाकर भट यांना देण्यात आला. आतापर्यंत १८ जनसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी देशभरातील सेवाभावी संस्थांना विकासाच्या विविध विषयांवर मदत करणाऱ्या सेवावर्धिनी या संस्थेस जनसेवा पुरस्कार देण्यात आला,’ असे घोलबा यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZTNCF
Similar Posts
नाना पालकर स्मृती समितीला जनसेवा पुरस्कार प्रदान पुणे : जनसेवा सहकारी बँकेतर्फे दर वर्षी देण्यात येणारा जनसेवा पुरस्कार यंदा गरजू रुग्णांना अत्यल्प दरात उच्चतम वैद्यकीय मदत करणाऱ्या नाना पालकर स्मृती समिती संस्थेस प्रदान करण्यात आला. बँकेच्या ४७ व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड
उद्योजकता विकासासाठी बीव्हीजी-डिक्की एकत्र पुणे : शेतकऱ्यांमधून उद्योजक निर्माण करण्यासाठी ‘बीव्हीजी उद्योग समूह’ आणि ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’ (डिक्की) एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याची माहिती ‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी नुकतीच एका कार्यक्रमात दिली.
जनसेवा बँकेच्या डेक्कन शाखेचे स्वमालकीच्या जागेत स्थलांतर पुणे : जनसेवा सहकारी बँकेच्या शिवाजीनगर-डेक्कन शाखेचे स्थलांतर एरंडवणे येथील स्वमालकीच्या जागेत झाले. सोमवारी (१४ ऑक्टोबर) या नूतन वास्तूचे उद्घाटन लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते झाले. या वेळी पुणे महानगरचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बँकेचे अध्यक्ष प्रदीप जगताप,
बालदिनी विशेष मुलांसाठी काँग्रेसतर्फे खास कार्यक्रम पुणे : पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती अर्थात बालदिनानिमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटीने कामायनी संस्थेतील मूकबधिर व मतिमंद मुलांसोबत विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. जंगली महाराज रोडवरील मॅकडोनाल्ड येथे १४ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. टॅटू पेंटिंगसह अन्य वेगवेगळ्या गमतीजमतींचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language